लखनऊ -२० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारताचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला या संघात स्थान मिळालेले नाही.
हेही वाचा - भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या प्रवक्त्याने संघाच्या घोषणेची माहिती दिली. तर, फिरकीपटू कर्ण शर्मा संघाची उप-कर्णधारपदाची सूत्रे सांभाळेल. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या खराब कामगिरीनंतर संघाची कमान प्रियम गर्गकडून अनुभवी भुवनेश्वरकडे सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेत खेळलेल्या रैनाला मात्र, विजय हजारे स्पर्धेसाठी संघात जागा मिळालेली नाही.