महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भुवी म्हणतो, 'या' फलंदाजाला रोखण्यासाठी 'नशीब' महत्त्वाचं - भुवनेश्वर कुमार लेटेस्ट न्यूज

भुवनेश्वर म्हणाला, "तुम्ही कोठे खेळत आहात ते पाहणे महत्त्वाचे ठरते. मैदानाचे परिमाण, चौकाराची सीमासुद्धा महत्त्वाची आहे. जर मैदानाविषयी तुम्हाला अगोदर माहिती असेल तर गोलंदाजी करणे सोपे होते. पण रसेल खूप मजबूत फलंदाज आहे. गेल्या आयपीएलच्या मोसमात आपण त्याची तुफानी फलंदाजी पाहिली असेल. त्याचे चुकून लागलेले फटकेसुद्धा षटकार जात होते. त्यामुळे त्याच्याविरूद्ध गोलंदाजी करताना भाग्य खूप महत्वाचे असते."

bhuvneshwar kumar praises andre russell for his batting
भुवी म्हणतो, 'या' फलंदाजाला गोलंदाजी करताना लागतं 'नशीब'

By

Published : Jun 28, 2020, 3:46 PM IST

Updated : Jun 28, 2020, 8:22 PM IST

हैदराबाद -भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपली पात्रता विविध स्तरावर सिद्ध केली आहे. आयपीएल असो किंवा भारतीय संघ असो भुवनेश्वरने अनेक दिग्गज फलंदाजांना लोटांगण घालण्यास भाग पाडले आहे. मात्र एका फलंदाजाविषयी नशीबाची आवश्यकता असल्याचे भुवनेश्वरने सांगितले आहे.

भुवनेश्वर कुमारने विंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलचे कौतुक केले आहे. रसेलची फलंदाजी नेहमी पाहण्यासारखी असते. त्याच्या वेगवान फलंदाजीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता येते. भुवनेश्वर म्हणाला, "तुम्ही कोठे खेळत आहात ते पाहणे महत्त्वाचे ठरते. मैदानाचे परिमाण, चौकाराची सीमासुद्धा महत्त्वाची आहे. जर मैदानाविषयी तुम्हाला अगोदर माहिती असेल तर गोलंदाजी करणे सोपे होते. पण रसेल खूप मजबूत फलंदाज आहे. गेल्या आयपीएलच्या मोसमात आपण त्याची तुफानी फलंदाजी पाहिली असेल, त्याचे चुकून लागलेले फटकेसुद्धा षटकार जात होते. त्यामुळे त्याच्याविरूद्ध गोलंदाजी करतानाल भाग्य खूप महत्वाचे असते."

भुवनेश्वर पुढे म्हणाला, "मला आठवत आहे, जेव्हा मी गेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कर्णधार होतो त्यावेळी त्याने तीन षटकांमध्ये 52 धावा केल्या होत्या. त्याचे दोन-तीन षटकार इतके लांब होते की इतर कुठल्याही फलंदाजाने इतके लांब षटकार मारले नसते.''

Last Updated : Jun 28, 2020, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details