दुबई - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मात्र, यंदाच्या हंगामात त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. इतकेच नव्हे, तर तब्बल १०० चेंडू खेळूनही स्टोक्स आपल्या पहिल्या षटकाराची प्रतीक्षा करत आहे.
तब्बल १०३ चेंडू खेळूनही बेन स्टोक्स षटकारासाठी उपाशी! - ben stokes ipl 2020 news
आयपीएलमध्ये ४०वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात स्टोक्सने ३० धावा केल्या. मात्र, तो षटकार मारण्यात अपयशी ठरला. तब्बल १०० चेंडू खेळूनही स्टोक्स आपल्या पहिल्या षटकाराची प्रतीक्षा करत आहे.
आयपीएलमध्ये ४०वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात स्टोक्सने ३० धावा केल्या. मात्र, तो षटकार मारण्यात अपयशी ठरला. बेन स्टोक्सने या आयपीएलमध्ये एकूण १०३ चेंडूंचा सामना केला आहे. त्याने १४ चौकार ठोकले असून २२च्या सरासरीने ११० धावा केल्या आहेत. मात्र त्याला एकही षटकार ठोकता आलेला नाही.
या हंगामात आयपीएलमधील आतापर्यंतची स्टोक्सची धावसंख्या ४१ आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो राशिद खानच्या चेंडूवर बाद झाला. मागील हंगामातही त्याला ९ सामन्यांत फक्त ४ षटकार ठोकता आले होते.