महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बेन स्टोक्सचा कांगारुंना इशारा, 'आर्चर आपले हत्यार वापरतच राहणार' - बाऊन्सर

स्टोक्स म्हणाला, 'जोफ्रा वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळतो. तो फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू देत नाही.  बाऊन्सर हे त्याचे मोठे हत्यार असून तो ते नेहमी वापरणार आहे.' आर्चरच्या  बाऊन्सरमुळे स्टीव स्मिथला दुखापत झाली. या घटनेमुळे स्मिथ अॅशेसच्या तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे.

बेन स्टोक्सचा कांगारुंना इशारा, म्हणाला, 'आर्चर आपले हत्यार वापरत राहणार'

By

Published : Aug 20, 2019, 10:13 PM IST

लंडन -येत्या गुरुवारपासून अॅशेसच्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, इंग्लंडच्या बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलिया संघाला इशारा दिला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यापुढेही अशीच आक्रमक गोलंदाजी करेल असे स्टोक्सने म्हटले आहे.

स्टोक्स म्हणाला, 'जोफ्रा वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळतो. तो फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू देत नाही. बाऊन्सर हे त्याचे मोठे हत्यार असून तो ते नेहमी वापरणार आहे.' आर्चरच्या बाऊन्सरमुळे स्टीव स्मिथला दुखापत झाली. या घटनेमुळे स्मिथ अॅशेसच्या तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे.

स्टोक्स पुढे म्हणाला, 'एखाद्या फलंदाजाला दुखापत झाली की कोणताही गोलंदाज गोलंदाजी करणे थांबवत नाही. जेव्हा एखाद्याला दुखापत होते तेव्हा चिंता नक्कीच असते. पण, तुम्हाला तुमची सर्वोत्तम गोलंदाजी सुरू ठेवायची असते.'

आर्चरच्या गोलंदाजीबद्दल बोलताना स्टोक्स पुढे म्हणाला, 'असे काही गोलंदाज आहेत ज्यांना बघून तुम्हाला माहित असते की तो कोणत्या प्रकारचा चेंडू टाकणार आहे. पण जोफ्राची गोलंदाजी वेगळी आहे. तो त्याच्या वेगळ्याच लयीत गोलंदाजी करतो. त्यामुळे तो बाऊन्सर कधी टाकणार हे सांगणे कठीण जाते.'

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने आपल्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला. त्याने ९१ धावांत पाच बळी घेतले. त्याने आपल्या आक्रमक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details