साऊथम्प्टन - इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्णधार बेन स्टोक्सने विंडीजविरूद्धच्या सामन्यात विक्रम रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा आणि 150 बळी घेणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या स्टोक्सने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हा विक्रम केला. त्याने पहिल्या डावात चार बळी टिपले.
स्टोक्सने इंग्लंडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. आयसीसीनेही या विक्रमाबद्दल स्टोक्सचे अभिनंदन केले आहे. या यादीमध्ये वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिस, भारताचे कपिल देव आणि माजी न्यूझीलंड कर्णधार डॅनियल व्हेटोरी यांचा समावेश आहे. सोबर्स यांनी 63 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता, तर स्टोक्सने 64 कसोटी सामन्यात ही कामगिरी नोंदवली.