नवी दिल्ली -आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज नुकताच कॅनडाच्या ग्लोबल टी-२० लीगमध्ये खेळला. या लीगमध्ये युवराजने आपल्या टोरंटो नॅशनल्स संघाचे कर्णधारपद भूषवले. युवराजच्या संघाला या स्पर्धेचे जेतेपद जिंकता आले नसले तरी युवीने स्पर्धेत केलेल्या काही भन्नाट खेळीने त्याचे चाहते खूश झाले. या स्पर्धेदरम्यान त्याचाच सहकारी असलेल्या बेन कटींगच्या प्रेयसीने एक आरोप केला आहे.
त्याचे झाले असे की, स्पर्धेदरम्यान एरिन हॉलंडने आपला प्रियकर बेनची मुलाखत घेतली होती. आणि या मुलाखतीदरम्यान, युवराज मध्ये आला होता. मुलाखत सुरु असताना त्याने दोघांना ‘लग्न कधी करणार?’ असा त्याने थेट प्रश्न केला होता. त्यांच्या या मजेशीर मुलाखतीचा व्हिडिओ ग्लोबल टी२० कॅनडाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. त्यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला.