चेस्टर ली स्ट्रीट -आयसीसी विश्वकरंडकात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 9 गडी राखून दणदणीत विजय साजरा केला. या सामन्यात श्रीलंकेची फलंदाजी चालू असताना 48व्या षटकात अचानक मधमाशांनी खेळपट्टीवर आक्रमण केले. मधमाशांच्या या अचानक हल्यांमुळे सर्व खेळाडू आणि पंच आपला चेहरा लपवत मैदानावरच आडवे झाले. मधमाशांनी केलेल्या या हल्याचा फोटो आयसीसीने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
...यामुळे श्रीलंका-दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान पंचांसह सर्व खेळाडू चक्क मैदानावर झोपले - South Africa
'या' कारणामुळे श्रीलंका-दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्व खेळाडू आणि पंच झोपले मैदानात
'या' कारणामुळे श्रीलंका-दक्षिण आफ्रिका सामन्याम्यान सर्व खेळाडू आणि पंच झोपले मैदानात
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मात्र आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंकन फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि 49.3 षटकांमध्ये अवघ्या 203 धावांमध्ये सर्वबाद झाला. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 37.2 षटकांमध्ये एका गड्याच्या बदल्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार डु प्लेसिसने 96 आणि आमलाने 80 तर धावांची नाबाद खेळी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.