मुंबई- बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख पदावर माजी फिरकीपटू सुनिल जोशी यांची निवड करण्यात आली आहे. निवड समितीच्या प्रमुखपदासाठी लक्ष्मण शिवरामनकृष्णन, राजेश चौहान, हरविंदर सिंह, वेंकटेश प्रसाद आणि सुनिल जोशी या पाच जणांच्या मुलाखती मुंबईत झाल्या. यानंतर मदनलाल, आर.पी. सिंह आणि सुलक्षणा नाईक यांच्या समितीने सुनिल जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपला होता. यामुळे निवड समितीच्या प्रमुख पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. व्यंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन यासारखे उमेदवार या पदाच्या शर्यतीत होते. पण यात सुनिल जोशी यांनी बाजी मारली. निवड समितीमध्ये हरविंदर सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.