महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

येणाऱ्या पिढ्या तुमचं कौतुक करतील; बीसीसीआयचा अभिनंदनला सलाम - अभिनंदन वर्धमान

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अभिनंदनच्या क्रिकेट जर्सीचा फोटो शेअर केला आहे. या जर्सीवर विंग कमांडर अभिनंदन असे लिहून खाली नंबर १ देण्यात आला आहे. 'तुम्ही आकाशावर राज्य करता आणि तुम्ही लोकांच्या हृदयावर राज्य करता, तुमचे धैर्य आणि कर्तुत्व येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल', असे पोस्टमध्ये लिहले आहे.

मुंबई

By

Published : Mar 2, 2019, 9:35 AM IST

मुंबई - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे वींग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी अखेर मायदेशात परतले. वाघा सीमेवर अभिनंदन यांना भारतीय हवाई दलाकडे सोपवण्यात आले आहे. यानंतर सीमेवर नागरिकांनी जल्लोष केला. त्यांच्या भारतात परतण्याचा सर्व देशवासीयांना अभिमान आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)नेही त्यांचे जल्लोषात स्वागत केले आहे.

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अभिनंदनच्या क्रिकेट जर्सीचा फोटो शेअर केला आहे. या जर्सीवर विंग कमांडर अभिनंदन असे लिहून खाली नंबर १ देण्यात आला आहे. 'तुम्ही आकाशावर राज्य करता आणि तुम्ही लोकांच्या हृदयावर राज्य करता, तुमचे धैर्य आणि कर्तुत्व येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल', असे पोस्टमध्ये लिहले आहे.

भारतीय आजी-माजी खेळाडूंनीही ट्विटरवरून अभिनंदनच्या मायदेशी परतण्याचे स्वागत केले आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अभिनंदनच्या धैर्य, निःस्वार्थपणा आणि दृढनिश्चयाचे कौतुक केले आहे. आपला हिरो आपल्याला स्वता:वर विश्वास ठेवण्यास शिकवतो, असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विट केले आहे. 'खरा नायक, मी आपल्याला सलाम करतो, जय हिंद', असे ट्विट करत त्याखाली अभिनंदनचा फोटो शेअर केला आहे. 'आम्ही तुझ्या बहादुरीला सलाम ठोकतो', असे ट्विट भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी केले आहे. टेनिसस्टार सानिया मिर्झानेही ट्विटरवरून अभिनंदनचे स्वागत केले आहे. तू आमचा खऱ्या अर्थाने हिरो आहेस. तुम्ही दाखवलेल्या बहादुरी आणि धैर्याला देश सलाम करतो. सानियाचे पती शोएब मलिक पाकिस्तानी असूनही तिने अभिनंदनचे कौतुक केले आहे.
यांच्यासह व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, रोहित शर्मा आणि इतर आजी-माजी खेळाडूंनी अभिनंदनचे स्वागत केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details