नवी दिल्ली -बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटमधील वयाशी संबंधित अडचणींबाबत नवीन धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. 2020-21 हंगामात बीसीसीआयच्या सर्व वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेत असलेल्या खेळाडूंना हे नवीन नियम लागू होतील.
नवीन धोरणानुसार, जर खेळाडूने वयसंबंधित चुकीची माहिती दिली किंवा वयचोरी केली, तर बीसीसीआय त्याच्यावर दोन वर्षांसाठी बंदी घालू शकते. या नवीन धोरणांतर्गत, जो खेळाडू आपली बनावट कागदपत्रे सादर करेल आणि आपल्या जन्माच्या तारखेमध्ये छेडछाड केलेले कबूल करेल, अशा खेळाडूला प्रतिबंधित केले जाणार नाही. त्याने योग्य वय सांगितले, तर त्याला स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाईल.
खेळाडूला त्याचे स्वाक्षरी केलेले पत्र/ईमेल पाठवावे लागेल, ज्यासह त्याला संबंधित विभागाकडून पडताळणीसह 15 सप्टेंबरपर्यंत त्याच्या वास्तविक जन्माच्या तारखेची कागदपत्रे सादर करावी लागतील.