मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी अखेरीस कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारला ५१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. सर्व स्तरावरून मदतीचा ओघ वाहत असताना, बीसीसीआयवर टीका होत होती. तेव्हा शनिवारी बीसीसीआयनेही याची घोषणा केली. पण, बीसीसीआयच्या या मदतीवर चाहते चांगलेच खवळले आहे. त्यांनी भीक देताय का? असा सवाल बीसीसीआयला विचारला आहे.
कोरोनविरुद्धच्या लढ्यासाठी अनेक दानशूर मंडळींनी पुढाकार घेतला आहे. यात खेळाडूंही मागे राहिले नाहीत. भारताचा माजी मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने ५० लाख, सुरैश रैनाने ५२ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील ५० लाख रुपयांचे तांदुळ मदत म्हणून देणार असल्याचे सांगितले आहे.