मुंबई - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग भयभीत झाले आहे. भारतालाही या व्हायरसचा फटका बसला असून संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी अनेकजण विविध अंगाने मदत करत आहेत. क्रीडाक्षेत्रही या मदतीमध्ये मागे राहिले नसून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयनेही आपली मदत जाहीर केली आहे.
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात बीसीसीआयची उडी, ५१ कोटींंची मदत जाहीर - बीसीसीआयची ५१ कोटींची आर्थिक मदत न्यूज
बीसीसीआय पंतप्रधान मदतनिधीला ५१ कोटींचा निधी देणार आहे. बीसीसीआये परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत याबद्दल निर्णय घेतला.
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात बीसीसीआयची उडी, ५१ कोटींंची मदत जाहीर
बीसीसीआय पंतप्रधान मदतनिधीला ५१ कोटींचा निधी देणार आहे. बीसीसीआये परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत याबद्दल निर्णय घेतला.
बीसीसीआयपूर्वी, क्रीडाक्षेत्रातील अनेक व्यक्तींनी आपली मदत जाहीर केली आहे. क्रिकेटपटू सुरेश रैनाने ५२ लाखांची तर, सचिन तेंडुलकरने ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.