नवी दिल्ली -कोरोनाविरूद्ध संरक्षण म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या कारणास्तव, क्रिकेटशी संबंधित क्रियाकलापही थांबवण्यात आले. अशा परिस्थितीत क्रिकेट जगातील ख्यातनाम व्यक्ती आपापल्या घरी वेळ घालवत असून सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्क साधत आहेत. या यादीमध्ये आता भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रोड्रिग्जचेही नाव जोडले गेले आहे.
भारताची क्रिकेटपटू बनली गायिका!..बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ - jemimah rodrigues latest video news
भारतीय महिला संघाची स्टार जेमिमाचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. यात जेमिमा बॉलिवूडची जुनी गाणी गाताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर ती गिटार वाजवतानाही दिसत आहे.
भारताची क्रिकेटपटू बनली गायिका!..बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
भारतीय महिला संघाची स्टार जेमिमाचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. यात जेमिमा बॉलिवूडची जुनी गाणी गाताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर ती गिटार वाजवतानाही दिसत आहे.
19 वर्षीय जेमिमाने 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे', 'है अपना दिल तो आवारा', 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' यासारख्या जुन्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला.