मुंबई - मागील २०२० हे वर्ष कोरोना व्हायरसच्या विळख्यात गेले. कोरोनाचा फटका क्रिकेट विश्वाला देखील बसला. २०२० या वर्षात अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. पण वर्षाच्या अखेरीस पुन्हा क्रिकेट स्पर्धांना हळूहळू सुरूवात झाली आहे. आता क्रिकेट पूर्वपदावर येऊ लागले आहे. बीसीसीआयने भारतीय संघाचे पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार, भारतीय संघ वर्ष २०२१ ते २०२३ या दरम्यान चांगलाच व्यस्त राहणार असल्याचे दिसते. तसेच या दोन वर्षात भारताला २ टी-२० आणि १ एकदिवसीय विश्वकरंडकही खेळायचा आहे. पाहा भारतीय संघाचे शेड्यूल...
- २०२१ मध्ये भारतीय संघाचे शेड्यूल -
एप्रिल ते मे २०२१
आयपीएल २०२१
- जून ते जुलै २०२१
जागतिक कसोटी अजिंक्यपद (जून)
भारत वि. श्रीलंका (३ एकदिवसीय, ५ टी-२०)
अशिया कप
- जुलै २०२१
भारत वि. झिम्बाब्वे (३ एकदिवसीय)
- जुलै ते सप्टेंबर २०२१
भारत वि. इंग्लंड (५ कसोटी)
- ऑक्टोबर २०२१
भारत वि. दक्षिण अफ्रिका (३ एकदिवसीय, ५ टी-२०)
- ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२१
आयसीसी टी-२० विश्व करंडक
- नोव्हेंबर ते दिसंबर २०२१
भारत वि. न्यूझीलंड (२ कसोटी, ३ टी-२०)
भारत वि. दक्षिण अफ्रिका (३ कसोटी, ३ टी-२०)
२०२२ मध्ये भारतीय संघाचे असे आहे शेड्यूल:
- जानेवारी ते मार्च २०२२
भारत वि. वेस्टइंडीज (३ एकदिवसीय, ३ टी-२०)