नवी दिल्ली -स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांतला बीसीसीआयने दिलासा दिला आहे. बीसीसीआयने श्रीशांतवरची आजीवन बंदी ७ वर्षाने कमी केली आहे. त्यामुळे तो या बंदीतून १३ सप्टेंबर २०२०ला सुटणार आहे.
'केरळ एक्सप्रेस' क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतणार? पुढच्या वर्षी होऊ शकते पुनरागमन - आजीवन बंदी
या अगोदर मार्च २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने श्रीशांतवरची आजीवन बंदी हटवली होती. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला या बंदीबद्दल विचार करण्यास सांगितले होते. ही आजीवन बंदी जास्त आहे, असे कोर्टाने सांगितले होते.
या अगोदर मार्च २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने श्रीशांतवरची आजीवन बंदी हटवली होती. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला या बंदीबद्दल विचार करण्यास सांगितले होते. ही आजीवन बंदी जास्त आहे असे कोर्टाने सांगितले होते. न्यायमुर्ती डी. के. जैन म्हणाले, 'श्रीशांतचे वय आता ३५ वर्षांपलिकडे झाले आहे. त्याने आपल्या क्रिकेटचा चांगला काळ मैदानाबाहेर घालवला असून जवळपास ६ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवून त्याला ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा कालावधी सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करु शकतो.
२००५ मध्ये श्रीशांतने श्रीलंकाविरुद्ध नागपुर येथे एकदिवसीय पदार्पण केले होते. २००६ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. २७ कसोटीत त्याने ८७ तर ५३ एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ विकेट्स घेतल्य़ा आहेत.