हैदराबाद - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंशी केलेल्या कराराची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारातून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला वगळले आहे. धोनीला करारातून वगळल्यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर #ThankYouDhoni आणि #MSDhoni हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली. यानंतर बीसीसीआयने धोनीला करारातून का वगळले याचे स्पष्टीकरण दिले आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'करारातून वगळण्याचा निर्णय धोनीशी चर्चा केल्यानंतरच घेण्यात आला आहे.'
त्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी धोनीशी संवाद साधला आणि त्याच्याबरोबर या कराराविषयी चर्चा केली. या चर्चेदरम्यान, धोनीने सप्टेंबर २०१९ पासून कोणताही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याला या करारातून वगळण्यात येणार असल्याचे सांगितले.'