महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सौरव गांगुलींना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष व भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना आज (गुरूवार ता. ७ ) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

BCCI President Sourav Ganguly discharged from Woodlands Hospital in Kolkata.
सौरव गांगुलींना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

By

Published : Jan 7, 2021, 11:02 AM IST

Updated : Jan 7, 2021, 11:26 AM IST

कोलकाता (पश्चिम बंगाल) - बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष व भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना आज (गुरूवार ता. ७ ) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. यामुळे कोलकातामधील वूडलँड रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकार परिषदेत गांगुली यांनी सांगितलं की, 'माझ्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे, मी आभार मानतो. आता मी ठीक आहे.'

गांगुली यांना शनिवार ( ता 2. ) सकाळी घरात जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती गांगुली यांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये तीन ब्लॉकेज आढळले होते. यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

अँजिओप्लास्टी झाल्यानंतर गांगुली डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. बुधवारी गांगुली यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. पण डॉक्टरांनी निर्णय घेत त्यांना आज (गुरूवार) डिस्जार्ज दिला. याची माहिती वूडलँड रुग्णालय प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, गांगुली यांच्या प्रकृतीमध्ये झपाटय़ाने सुधारणा होत गेल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. गांगुली यांच्यावरील दुसरी अँजिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा -सिडनी कसोटी : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय

हेही वाचा -Video : राष्ट्रगीत सुरू असताना मोहम्मद सिराजला कोसळलं रडू

Last Updated : Jan 7, 2021, 11:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details