मुंबई -कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने घरच्या मैदानावरील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. मंडळाने शनिवारी निवेदन काढून याबाबत माहिती दिली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाचा कहर! बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी 'या' स्पर्धा पुढे ढकलल्या - BCCI postponed tournament news
बीसीसीआयने शनिवारी निवेदन काढून याबाबत माहिती दिली. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेलाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे.
इराणी चषक, वरिष्ठ महिला एकदिवसीय नॉक आऊट, विज्जी ट्रॉफी, वरिष्ठ महिला एकदिवसीय चॅलेंज, महिला अंडर-१९ एकदिवसीय नॉक आऊट, महिला अंडर-१९ टी-२० लीग , सुपर लीग आणि नॉक आऊट, महिला अंडर-१९ चॅलेंजर ट्रॉफी, महिला अंडर-२३ नॉक आउट, महिला अंडर-२३ एकदिवसीय चॅलेंजर्सं या सर्व स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.