मुंबई -दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाविरुध्द मालिका खेळण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी ऑगस्ट महिन्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी, भारतीय संघाला आफ्रिका दौऱ्यासाठी निमंत्रण दिले. मात्र, हा दौरा कठीण असल्याचे मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
अधिकारी म्हणाले, "हे शक्य नाही. फिटनेस प्रशिक्षण आणि फलंदाजी-गोलंदाजीचे प्रशिक्षण करणे या वेगळ्या गोष्टी आहेत. आमच्याकडे असे खेळाडू आहेत ज्यांनी मागील 50-60 दिवसांत चेंडूला आणि बॅटला स्पर्शही केलेला नाही. मग तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्याची अपेक्षा कशी करू शकता? आम्ही प्रशिक्षकांसोबत तंदुरुस्ती राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पण फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव आवश्यक असेल."