मुंबई- बीसीसीआयने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. बीसीसीआय दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी पाठवत असते. रोहितने २०१९ विश्वकरंडकात चांगली कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत ५ शतकं झळकावली. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
बीसीसीआयने रोहित शर्मा व्यतिरिक्त अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं पाठवली आहेत. शिखर धवनचे नाव दुसऱ्यांदा पाठवण्यात आले आहे. या आधी त्याचे नाव २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कारासाठी शर्यतीत होते. पण त्याची निवड झालेली नव्हती.