महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

देहराडूनमध्ये विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन; बीसीसीआयकडून मंजुरी - विजय हजारे ट्रॉफी

२४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान देहराडूनमधील चार मैदानांवर या स्पर्धा होतील. लवकरच बीसीसीआय याची अधिकृत घोषणा करेल.

देहराडूनमध्ये विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन, बीसीसीआयने दिली मंजूरी

By

Published : Jul 21, 2019, 5:36 PM IST

देहराडून - उत्तराखंडमधील सुविधा पाहून समाधानी झालेल्या बीसीसीआयने, यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन करण्यास उत्तराखंडला परवानगी दिली आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या प्लेट ग्रुप आणि नॉकआऊट मॅचेस उत्तराखंडमध्ये होणार आहेत. २४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबरच्या दरम्यान देहराडूनमधील चार मैदानांवर या स्पर्धा होतील. लवकरच बीसीसीआय याची अधिकृत घोषणा करेल.

देहराडूनमध्ये विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन, बीसीसीआयने दिली मंजूरी


मागील वर्षी उत्तराखंडमध्ये रणजी, मुलींचे अंडर-१९ सामने यांसोबतच अन्य अनेक स्पर्धांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी विजय हजारे ट्रॉफीचे क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल असे सामने देहराडूनमध्ये होतील.


विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांसाठी देहराडूनमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अभिमन्यु क्रिकेट स्टेडियम आणि कसिगा स्टेडियम ही तीन मैदाने निश्चित करण्यात आली आहेत. यासोबतच देहराडूनचे आणखी एक मैदान लवकरच निश्चित केले जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details