मुंबई -इंडियन प्रीमियर लीगचा १४वा हंगाम ११ एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. सुत्रांच्या माहितीनुसार, यंदाची आयपीएल स्पर्धा ११ एप्रिल ते ५ किंवा ६ जून दरम्यान होऊ शकते. बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने आयपीएलची तात्पुरती तारीख जवळपास निश्चित केली आहे.
हेही वाचा - इंग्लंडचा गोलंदाज म्हणतो, ''भारत अभेद्य नाही''
एका वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अंतिम निर्णय आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल घेईल, परंतु आयपीएलची तात्पुरती तारीख ११ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका मार्चमध्ये संपेल आणि त्यानंतर खेळाडूंना चांगली विश्रांती मिळेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका २८ मार्च रोजी संपेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ११ एप्रिलपासून आयपीएल आयोजित केल्यामुळे खेळाडूंना चांगला ब्रेक मिळेल, जेणेकरून ते 'फ्रेश' होतील आणि दीर्घ आयपीएलसाठी मैदानात परत येतील.