महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

BCCI वर आर्थिक मंदी, गांगुलीनं घेतला 'हा' निर्णय - बीसीसीआय

बीसीसीआयने आयपीएल विजेत्या संघांना देण्यात येणारी बक्षीस रक्कम निम्मी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासावर बंधन आणले आहेत.

BCCI Eyes Cost Cutting, Selectors To Fly In Economy Class, Chiefs In Business : Report
BCCI वर आर्थिक मंदी, गांगुलीनं घेतला 'हा' निर्णय

By

Published : Mar 18, 2020, 11:52 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आयपीएल स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे. जर आयपीएल स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. या आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीसीयने कॉस्ट कटिंगचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयने आयपीएल विजेत्या संघांना देण्यात येणारी बक्षीसाची रक्कम निम्मी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासावरही बीसीसीआयने बंधन आणले आहे.

एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने त्यांच्या अधिकाऱ्यांना देशांतर्गत विमान प्रवास हा बिझनेस क्लासऐवजी इकोनॉमी क्लासमधून करण्यास सांगितले आहे.

वरिष्ठ आणि कनिष्ठ संघाच्या निवड समितीचे प्रमुखच देशांतर्गत विमान प्रवास बिझनेस क्लासमधून करू शकणार आहेत. बीसीसीआयच्या महाप्रबंधकांनाही आता इकोनॉमी क्लासमधून प्रवास करावा लागणार आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण भारतातील सद्य परिस्थिती पाहता ही स्पर्धा १५ एप्रिलला सुरू होईल, हे सांगणे कठीण आहे. जर ही स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा -'धोनी फिट असेल तर तो टीम इंडियासाठी हिट आहे'

हेही वाचा -संजय बांगर यांना बीसीबीकडून सल्लागारपदाची ऑफर; पण 'ही' ठरली अडचण

ABOUT THE AUTHOR

...view details