मुंबई - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील रविवारी झालेल्या एजीएमच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत लोढा समितीच्या पदाधिकाऱ्यांसाठी असलेल्या शिफारसींमध्ये बदल करण्यावर एकमत झालं असून या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ शिथिल करण्यास मान्यता दिली आहे.
हेही वाचा -त्रिशतकवीर वॉर्नरची भविष्यवाणी, 'लाराचा ४०० धावांचा विक्रम 'हा' फलंदाज मोडेल'!
बीसीसीआयच्या ८८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) हा निर्णय घेण्यात आला. याद्वारे गांगुलीचा कार्यकाळ ९ महिन्यांसाठी वाढू शकतो. हे नियम शिथिल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मंडळ मान्यता घेणार आहे.
सध्याच्या शिफारशीनुसार पुढील वर्षात गांगुलीला आपलं पद सोडावं लागणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयने सूचवलेल्या बदलांना मान्यता दिल्यास सौरव २०२४ सालापर्यंत तो अध्यक्षपदी राहु शकतो. कूलिंग ऑफ पीरियडवर काय निर्णय घेण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.