महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

''हिटमॅन आम्हाला तुझा अभिमान आहे'', बीसीसीआयकडून रोहितचे अभिनंदन - रोहित शर्मा लेटेस्ट न्यूज

बीसीसीआयने ट्विट करून रोहितचे अभिनंदन केले आहे. "राजीव गांधी खेलरत्न-२०२० प्राप्त झाल्याबद्दल रोहित शर्माचे अभिनंदन. हा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे हिटमॅन", असे बीसीसीआयने ट्विटरवर म्हटले. रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा अ‍ॅथलीट मारियाप्पन थांगावेलु आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्रा यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच संयुक्तपणे पाच खेळाडूंची निवड झाली आहे.

BCCI congratulates rohit sharma on getting khel ratna award
''हिटमॅन आम्हाला तुझा अभिमान आहे'', बीसीसीआयकडून रोहितचे अभिनंदन

By

Published : Aug 22, 2020, 2:45 PM IST

नवी दिल्ली -भारतीय संघाचा सलीमीवर फलंदाज रोहित शर्माला यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मिळालेल्या रोहितचे बीसीसीआयने अभिनंदन केले आहे. हा सन्मान मिळवणारा रोहित हा देशातील चौथा क्रिकेटपटू आहे.

बीसीसीआयने ट्विट करून रोहितचे अभिनंदन केले आहे. "राजीव गांधी खेलरत्न-२०२० प्राप्त झाल्याबद्दल रोहित शर्माचे अभिनंदन. हा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे हिटमॅन", असे बीसीसीआयने ट्विटरवर म्हटले. रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा अ‍ॅथलीट मारियाप्पन थांगावेलु आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्रा यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच संयुक्तपणे पाच खेळाडूंची निवड झाली आहे.

रोहित शर्माने गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली होती. जिथे त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५७.३० च्या सरासरीने १४९० धावा केल्या आहेत. २०१९च्या विश्करंडक स्पर्धेत रोहितने ६४८ धावा करत दमदार कामगिरी नोंदवली होती. रोहितपूर्वी, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या क्रिकेटपटूंना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. १९९८मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. २००७मध्ये भारताला टी-२० विश्वविजेता बनवल्यानंतर धोनीने तर, २०१८मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूसमवेत विराट कोहलीने हा पुरस्कार पटकावला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details