नवी दिल्ली -यावर्षी चार सामन्यांऐवजी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा (सीए) प्रस्ताव स्वीकारणे शक्य होणार नाही, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौर्यावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. सीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केव्हिन रॉबर्ट्स यांनी भारतासोबत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता.
ऑस्ट्रेलियासोबत पाच सामन्यांची कसोटी मालिका अशक्य - गांगुली
गांगुली म्हणाला, "ऑस्ट्रेलियामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणे भारताला शक्य होईल असे मला वाटत नाही. मर्यादित षटकांची मालिकादेखील आहे आणि आम्हाला 14 दिवसांच्या क्वारंटाईन नियमांचे पालनही करावे लागेल."

बीसीसीआयशी असलेल्या संबंधांचा उल्लेख करताना रॉबर्ट्स म्हणाले, होते की पाच सामन्यांची मालिका निश्चित नसली तरी शक्य होऊ शकते. ''येत्या हंगामात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांबाबत काही निश्चितता नाही, परंतु मी असे म्हणू शकतो की बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांचे खूप चांगले नाते आहे. भविष्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याबद्दल चर्चा झाली आहे'', असे रॉबर्ट्स म्हणाले होते.