महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

श्रीलंकापाठोपाठ टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द

ठरलेल्या वेळापत्रकानुसार, भारतीय क्रिकेट संघ 24 जूनपासून तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका आणि त्यानंतर 22 ऑगस्टपासून तीन एकदिवसीय सामन्यांसाठी झिम्बाब्वेला जाणार होता. मात्र, कोरोनाची स्थिती पाहता हा दौराही रद्द करण्यात आला आहे.

bcci cancels india tour to zimbabwe due to coronavirus
श्रीलंकापाठोपाठ टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द

By

Published : Jun 12, 2020, 4:13 PM IST

मुंबई -कोरोनाव्हायरसच्या धोक्यामुळे बीसीसीआयने भारताचा झिम्बाब्वे दौरा रद्द केला आहे. यापूर्वी, बीसीसीआयने टीम इंडियाचा श्रीलंका दौराही रद्द केला होता.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार, भारतीय क्रिकेट संघ 24 जूनपासून तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका आणि त्यानंतर 22 ऑगस्टपासून तीन एकदिवसीय सामन्यांसाठी झिम्बाब्वेला जाणार होता. मात्र, कोरोनाची स्थिती पाहता हा दौराही रद्द करण्यात आला आहे.

"17 मे रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, बाहेरील प्रशिक्षणाचे वातावरण पूर्णपणे सुरक्षित असेल तरच बीसीसीआय करारबद्ध खेळाडूंसाठी शिबिर आयोजित करेल. बीसीसीआय आंतरराष्ट्रीय व घरगुती क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नांना धोकादायक ठरणारा घाईचा निर्णय घेतला जाणार नाही", असे मंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जून-जुलैमध्ये दौर्‍यावर जाणे शक्य नाही आणि आम्ही ते श्रीलंकेच्या बोर्डाकडे (एसएलसी) कळवले आहे. तथापि, आम्ही मालिकेसाठी (नंतरच्या तारखेला) वचनबद्ध आहोत, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनीही सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details