नई दिल्ली-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रारंभिक संघांपैकी एक असलेल्या डेक्कन चार्जर्सला चुकीच्या पद्धतीने काढून टाकल्याबद्दल 4,800 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी डेक्कन क्रॉनिकल्स होल्डिंग्ज (डीसीएचएल) च्या बाजूने निर्णय घोषित केला.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एका माध्यमाशी बोलतांना सांगितले की, हा निर्णय पूर्णपणे आश्चर्यकारक आहे, परंतु संपूर्ण आदेश पाहिल्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. तथापि या आदेशाविरुद्ध बोर्ड अद्याप अपील करू शकतो.