मुंबई - दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) धीरज मल्होत्रा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) नवे क्रीडा विकास महाव्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. मल्होत्रा माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांची जागा घेतील.
क्रिकेट विश्वात दोन दशकांहून अधिक काळ मल्होत्रा यांनी काम केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतही मल्होत्रा यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे. आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये क्रिकेट सामने आयोजित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.