महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर - बीसीसीआय लेटेस्ट न्यूज

महिलांच्या टी-२० चॅलेंजचा अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होणार आहे. संघ सुपरनोव्हाज, व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स एकमेकांशी एकदा सामना खेळतील.

bcci announces the schedule of women's t20 challenge
महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

By

Published : Oct 26, 2020, 3:30 PM IST

नवी दिल्ली - बीसीसीआयने ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान शारजाहमध्ये होणाऱ्या महिला टी-२० चॅलेंजचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी महिला खेळाडू दुबईला पोहोचल्या असून त्या सहा दिवसांसाठी क्वारंटाइन आहेत.

महिलांच्या टी-२० चॅलेंजचा अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होणार आहे. संघ सुपरनोव्हाज, व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स एकमेकांशी एकदा सामना खेळतील. त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएलच्या प्लेऑफचे सामने दुबई आणि अबुधाबी येथे खेळले जातील. तर महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा शारजाह येथे खेळवली जाईल.

महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा -

तारीख सामना सामन्याची वेळ
४ नोव्हेंबर सुपरनोव्हाज वि. व्हेलोसिटी सायं. ७.३० वा.
५ नोव्हेंबर व्हेलोसिटी वि. ट्रेलब्लेझर्स दु. ३.३० वा.
७ नोव्हेंबर सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स सायं. ७.३० वा.
९ नोव्हेंबर अंतिम सामना सायं. ७.३० वा.

ABOUT THE AUTHOR

...view details