नवी दिल्ली - न्यूझीलंडला टी-२० मालिकेत गारद केल्यानंतर, टीम इंडिया आता एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. तत्पूर्वी, भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा -अंडर १९ वर्ल्डकप : आज रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला
कसोटी संघात रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे. अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळे त्याला अर्ध्यातच मैदान सोडावे लागले होते. दरम्यान रोहितची दुखापत गंभीर असल्याने, तो एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. काल पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली होती.