अहमदाबाद - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज आपला संघ जाहीर केला आहे. निवड समिती उर्वरित कसोटी सामन्यांसाठी मोहम्मद शमीच्या नावाचा विचार करेल अशी अपेक्षा होती, परंतु शमी व नवदीप सैनी यांना विश्रांती देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला.
निवड समितीने उर्वरीत दोन कसोटीसाठी शार्दूल ठाकूर याला संघातून वगळले आहे. त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज करण्यात आले आहे. त्याच्या जागी उमेश यादव याचा संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु, उमेशला फिटनेस टेस्टमध्ये पास व्हावे लागेल. पहिली कसोटी खेळणाऱ्या शाहबाज नदीमला देखील दोन्ही कसोटीतून वगळण्यात आले आहे.
निवड समितीने पाच नेट गोलंदाज आणि दोन रिझर्व खेळाडूंच्या नावाची देखील घोषणा केली आहे. अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, कृष्णप्पा गौतम आणि सौरभ कुमार यांची निवड नेट गोलंदाज म्हणून करण्यात आली आहे. तर केएस भरत आणि राहुल चहर यांना रिझर्व खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.
मालिका सद्यघडीला आहे बरोबरीत