मुंबई- भारतीय क्रिकेट नियमन मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंचे वार्षिक करार जाहिर केले आहेत. एकूण २५ खेळाडूंसोबत बीसीसीआयने करार जाहिर केला आहे. यामध्ये ग्रेड ए प्लस पासून ग्रेड सी अशा विभागात खेळाडूंना विभागण्यात आले आहे. ए प्लस खेळाडूंना ७ कोटी तर ग्रेड सी खेळाडूंना १ कोटीचे मानधन बीसीसीआय देते.
बीसीसीआयने पंतला केले मालामाल, भुवनेश्वर आणि धवनचे नुकसान
ग्रेड ए प्लस पासून ग्रेड सी अशा विभागात खेळाडूंना विभागण्यात आले आहे. ए प्लस खेळाडूंना ७ कोटी तर ग्रेड सी खेळाडूंना १ कोटीचे मानधन बीसीसीआय देते.
विराट कोहली
ग्रेड ए प्लस (७ कोटी) - कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह
ग्रेड ए (५ कोटी) - रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत.
ग्रेड बी (३ कोटी) - केएल राहुल, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पंड्या
ग्रेड सी (१ कोटी) - केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडु, मनिष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद आणि ऋद्धिमान साहा
भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनचा गेल्यावर्षी ग्रेड ए प्लस करारामध्ये समावेश होता. दोघेही सध्या खराब फॉर्मात असल्यामुळे बीसीसीआयने त्यांना ग्रेड ए मध्ये टाकले आहे. ऋषभ पंतला बीसीसीआयने ग्रेड ए मध्ये समाविष्ट केले असून त्याला वार्षिक ५ कोटी इतके मानधन मिळणार आहे.