महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कर्णधारपदासाठी मी इच्छुक नाही; मला त्याचे लालूचही नाही, बाबर आझमची स्पष्टोक्ती

पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सरफराज अहमदचे कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी मागणी निवड समितीला केली. त्यांनी युवा खेळाडू बाबर आझम याकडे कसोटी संघाची धुरा द्यावी, असे सुचवले. आर्थर यांच्या सुचनेवर बाबर आझम याने प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो, 'मी कधीही पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाचा विचार केला नाही. नेहमी संघासाठी चांगली कामगिरीसाठी मी प्रयत्नशील असतो. मला कर्णधारपदाची आशा नाही. फक्त संघासाठी जास्ती जास्त धावा जमवणे हेच माझे उदिष्ट आहे'

कर्णधारपदाला मी इच्छुक नाही. मला त्याचे लालचही नाही, बाबर आझमची स्पष्टोक्ती

By

Published : Aug 7, 2019, 9:54 AM IST

कराची- विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. यामुळे निवड समितीसह खेळाडूंना चाहत्यांनी धारेवर धरले. माजी खेळाडूंनीही खेळाडूंच्या कामगिरीवर ताशेरे ओढले. त्यानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सरफराज अहमदचे कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी मागणी निवड समितीला केली. त्यांनी युवा खेळाडू बाबर आझम याकडे कसोटी संघाची धुरा द्यावी, असे सुचवले. आर्थर यांच्या सुचनेवर बाबर आझम याने प्रतिक्रिया दिली आहे.

पाकपेशन डॉट. कॉम या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, 'मी कधीही पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाचा विचार केला नाही. नेहमी संघासाठी चांगली कामगिरीसाठी मी प्रयत्नशील असतो. मला कर्णधारपदाची आशा नाही. फक्त संघासाठी जास्ती जास्त धावा जमवणे हेच माझे उदिष्ट आहे', असे बाबर आझम म्हणाला.

पुढे बाबर म्हणाला, सरफराजने संघाचे नेतृत्व चांगल्या पध्दतीने हाताळले आहे. कर्णधारपदाबद्दल काही निर्णय घ्यावयाचा असेल तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ते घेईल. बोर्ड ज्या खेळाडूंकडे संघाचे नेतृत्व सोपवेल ते आम्हाला पसंत आहे. मात्र मला वाटते की, सरफराज संघाची धुरा व्यवस्थित सांभाळत आहे.

बाबर आझम हा पाकिस्तान संघाचा आघाडीचा फलंदाज असून त्याने आपल्या तंत्रशुध्द फलंदाजीने अनेक सामने पाकिस्तान संघाला जिंकून दिले आहेत. बाबरने पाकिस्तानकडून २१ कसोटी, ७२ एकदिवसीस सामने, तर ३० टी-२० सामने खेळले आहेत.

दरम्यान, पाकचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने सरफराज अहमदकडून संघाचे नेतृत्व काढून घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्याच्या मते, एकदिवसीय आणि टी-२० चे संघाचे नेतृत्व हॅरिस सोहेलकडे, तर कसोटीचे कर्णधारपद बाबर आझमकडे सोपवले पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details