महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा : बडोद्याची अंतिम फेरीत धडक - baroda vs punjab news

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बडोद्याने पंजाबचा २५ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.

baroda reached into final of the syed mushtaq ali trophy 2021
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा : बडोद्याची अंतिम फेरीत धडक

By

Published : Jan 30, 2021, 10:11 AM IST

मुंबई - सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत बडोद्याने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत बडोद्याने पंजाबचा २५ धावांनी पराभव केला.

केदार देवधर आणि कार्तिक काकाडे या दोघांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर बडोद्याने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद १६० धावा केल्या. केदार देवधरने ४९ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. तर कार्तिकने ४१ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी साकारली.

प्रत्त्युत्तरादाखल पंजाबच्या संघाला १३५ धावांपर्यंतच मजल मारता आली. बडोद्याच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा केला. पंजाब संघाने नियमीत अंतरावर आपले फलंदाज गमावले. पंजाबसाठी मनदीप सिंहने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली.

दरम्यान, अंतिम फेरीमध्ये बडोद्याचा सामना दिनेश कार्तिकच्या तामिळनाडू संघासोबत होणार आहे. हा सामना रविवारी (ता. ३१) होईल.

हेही वाचा -चक्क आयसीसीने उडवली पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची खिल्ली!

हेही वाचा -भारताचा इंग्लंड दौरा : भारताचे भारतासोबत रंगणार सराव सामने

ABOUT THE AUTHOR

...view details