महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कृणालसोबतचे भांडण आले अंगउलट, दीपक हुड्डावर मोठी कारवाई - दीपक हुडा लेटेस्ट न्यूज

बडोदा क्रिकेट असोसिएशनेचे अध्यक्ष सत्यजित गायकवाड यांनी सांगितले की, अपेक्स कौन्सिलच्या निर्णयानुसार, चालू देशांतर्गत क्रिकेट मोसमात दीपक बडोद्याचे प्रतिनिधित्व करु शकणार नाही. संघव्यवस्थापनाकडून आणि प्रशिक्षकाकडून या घटनेबाबात पूर्ण माहिती घेतल्यानंतर आणि दीपकबरोबर चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Baroda cricket association  suspend deepak hooda for indiscipline and bringing disrespect to game
कृणालसोबतचे भांडण आले अंगउलट, दीपक हुड्डावर मोठी कारवाई

By

Published : Jan 22, 2021, 3:21 PM IST

बडोदा -१० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला प्रारंभ झाला. मात्र, स्पर्धेच्या एका दिवसापूर्वी, बडोद्याचा क्रिकेटपटू दीपक हुड्डाने आपल्या संघाचा कर्णधार कृणाल पांड्यावर गंभीर आरोप करत स्पर्धेतून माघार घेतली. कृणाल शिवीगाळ करत असल्यामुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याने दीपकने बडोदा क्रिकेट असोसिएशनला (बीसीए) पत्राद्वारे कळवले होते. मात्र, दीपकचा हा निर्णय अंगउलट आला आहे. बीसीएने दीपकवर यंदाच्या संपूर्ण देशांतर्गत क्रिकेट हंगामातून निलंबनाची कारवाई केली आहे.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर मायदेशी परतले अश्विन आणि सुंदर

याप्रकरणी बडोदा क्रिकेट असोसिएशनेचे अध्यक्ष सत्यजित गायकवाड यांनी सांगितले की, अपेक्स कौन्सिलच्या निर्णयानुसार, चालू देशांतर्गत क्रिकेट मोसमात दीपक बडोद्याचे प्रतिनिधित्व करु शकणार नाही. संघव्यवस्थापनाकडून आणि प्रशिक्षकाकडून या घटनेबाबात पूर्ण माहिती घेतल्यानंतर आणि दीपकबरोबर चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. दीपक यंदाच्या हंगामात सहभागी होऊ शकला नाही तरी तो २०२१-२२ या पुढील हंगामात सहभागी होऊ शकतो.

नक्की प्रकरण काय?

बडोदाच्या रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना कृणाल आणि दीपक यांच्यात भांडण झाले. कृणालने वादादरम्यान दीपकला धमकी दिली असल्याचे वृत्त समोर आले. प्रशिक्षकाच्या परवानगीने सराव करत असतानाही कृणालने धमकावण्यास सुरुवात केली असल्याचे दीपकने आपल्या पत्रात म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details