कोलंबो -बांगलादेश क्रिकेट संघाचा पुढील महिन्यात जुलैमध्ये होणारा श्रीलंका दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) बुधवारी ही माहिती दिली.
एसएलसीने एका निवेदनात म्हटले आहे, की "बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) आम्हाला सांगितले आहे, की आंतरराष्ट्रीय मालिकेत त्यांचे खेळाडू सहभाग घेण्यास तयार नाहीत. कोरोनामुळे तयारी करता आली नसल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. त्यामुळे बीसीबी आणि आम्ही या गोष्टीशी सहमत आहे."
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) बांगलादेशचा श्रीलंका दौरा पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी बांगलादेशची न्यूझीलंडविरुद्धची ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारी कसोटी मालिकाही पुढे ढकलण्यात आली आहे.
ही मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. बांगलादेशात आतापर्यंत कोरोनाच्या 115786 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1502 लोकं मरण पावले आहेत.