ढाका- अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने सोमवारी कसोटीमधून निवृत्ती घेतली. केवळ ३ कसोटी सामने खेळणाऱ्या ३४ वर्षीय नबीला संघाने बांगलादेशविरुध्दचा एकमेव कसोटी सामना जिंकत विजयी निरोप दिला. ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपल्या लाडक्या सहकाऱ्याला 'गार्ड ऑफ हॉनर' दिला.
मोहम्मद नबीला गार्ड ऑफ हॉनर देताना सहकारी... हेही वाचा -Ban vs Afg Test : अफगाणिस्तानच्या 'पठाणां'नी केली बांगलादेशी वाघांची शिकार
बांगलादेश विरोधातील सामन्यात अफगाणी कर्णधार राशिद खानने नेत्रदिपक कामगिरी केली. त्याने या सामन्यात एका अर्धशतकासह ११ गडी बाद केले. यामुळे राशिदला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले. राशिदने मात्र, हे पारिषोतिक नबीला समर्पित केले. राशिदच्या या निर्णयाचे क्रीडाप्रेमींमधून कौतुक होत आहे.
राशिद खान सामनावीरचा पुरस्कार नबीला समर्पित करताना.. हेही वाचा -राशिद खान : 'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिलाच कर्णधार
अफगाणिस्तान संघाला २०१७ मध्ये कसोटी खेळण्याचा दर्जा देण्यात आला. यानंतर अफगाणिस्तानने ३ कसोटी सामने खेळले आहेत. या तिनही सामन्यांमध्ये मोहम्मद नबी संघाचा सदस्य राहिला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने खेळलेल्या ३ कसोटी सामन्यात, २ विजय तर एक पराभव झाला आहे.
मोहम्मद नबी बांगलादेशविरुध्द विजय मिळवल्यानंतर जल्लोष करताना...