ढाका -ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारी न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका बांगलादेशने स्थगित केली आहे. ही मालिका बांगलादेशमध्ये होणार होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मंगळवारी ही माहिती दिली.
बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी सांगितले, ''सध्या कोरोनाचा कहर पाहता ऑगस्ट 2020 मध्ये संपूर्ण क्रिकेट मालिका आयोजित करणे आव्हानात्मक असेल. खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि संबंधित भागधारकांचे हित पाहता आम्ही कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही."