कोलकाता - भारत आणि बांगलादेश संघामध्ये २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान, ईडन गार्डन्स मैदानात कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसिना यांना निमंत्रण पाठवले आहे. दररम्यान, या कसोटीसाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही निमंत्रण पाठवण्यात आले असल्याचे समजते.
सूत्रांच्या महितीनूसार, बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसिना यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाबद्दलची जबाबदारी बीसीसीआयचे भावी अध्यक्ष सौरव गांगुलीकडे आहे. दोनही पंतप्रधान जर या सामन्याला उपस्थित राहिले तर या सामन्याला वेगळे महत्व प्राप्त होईल.