नवी दिल्ली -बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शरीफने शनिवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शरीफने २००७ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. २० वर्षाची क्रिकेट कारकीर्द असणाऱया शरीफने २००१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण नोंदवले होते.
२००७ मध्ये शेवटचा सामना खेळलेला गोलंदाज झाला निवृत्त - Mohammad Sharif announces retirement news
शरीफने बांगलादेशसाठी ९ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने १० बळी घेतले आहेत. त्याचे कसोटी पदार्पण झिम्बाब्वेविरुद्ध झाले होते. शरीफने १० कसोटी सामन्यात १४ बळी घेतले आहेत. २००७ मध्ये त्याने लंकेविरूद्ध कोलंबो येथे अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

२००७ मध्ये शेवटचा सामना खेळलेला गोलंदाज झाला निवृत्त
शरीफने बांगलादेशसाठी ९ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने १० बळी घेतले आहेत. त्याचे कसोटी पदार्पण झिम्बाब्वेविरुद्ध झाले होते. शरीफने १० कसोटी सामन्यात १४ बळी घेतले आहेत. २००७ मध्ये त्याने लंकेविरूद्ध कोलंबो येथे अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी चमक न दाखवू शकलेल्या ३४ वर्षीय शरीफने घरगुती स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १३२ सामन्यात ३९३ फलंदाजांना माघारी धाडले होते.
TAGGED:
मोहम्मद शरीफ निवृत्त न्यूज