ढाका - वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघाने घोषणा केली आहे. बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनची संघात वापसी झाली आहे. तो मॅच फिक्सिंग प्रकरणात बंदीची शिक्षा भोगल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.
बांग्लादेशचा संघ पहिल्यांदाच तमीम इक्बालच्या नेतृत्वात पहिली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बांग्लादेश बोर्डाने मेहदी हसन, हसन महमूद आणि शोरिफूल इस्लाम या तिघांची निवड १८ सदस्यीय संघात अनकॅप्ड खेळाडू म्हणून केली आहे. दरम्यान, बांग्लादेशचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार मुशरफे मोर्तजाला संघातून वगळण्यात आले आहे.
वेस्ट इंडीजचा संघ बांग्लादेशमध्ये दाखल झाला असून सद्या खेळाडू विलगीकरण आहेत. कोरोना चाचणीत विंडीजचा फिरकीपटू हेडन ज्यूनियर वॉल्श पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर उपचार सुरू असून तो या मालिकेत खेळणार नाही.