ढाका -बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा (बीसीबी) विकास प्रशिक्षक आशिकुर रहमान याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर रेहमानला दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बांगलादेशच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण - bangladesh cricketer corona positive news
2002 च्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशच्या संघात आशिकुर रहमानचा सहभाग होता. त्याने बांगलादेशकडून 15 प्रथम श्रेणी-सामने आणि 18 लिस्ट-ए सामने खेळले आहेत.
बांगलादेशच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण
आशिकुर रहमानने स्वत: हून एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. तो म्हणाला, "आधी मला काही समजले नाही. मला वाटले की माझा घसा सुजला आहे. नंतर मला हळूहळू ताप येऊ लागला. त्यानंतर मला छातीत वेदना होऊ लागल्या. मी डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी माझी चाचणी केली.''
2002 च्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशच्या संघात रहमानचा सहभाग होता. त्याने बांगलादेशकडून 15 प्रथम श्रेणी-सामने आणि 18 लिस्ट-ए सामने खेळले आहेत.