ढाका -बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार तमिम इक्बाल आणि टी-20 कर्णधार महमूदुल्लाह रियाध यांनी कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये (सीपीएल) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तमिम आणि महमूदुल्लाह सीपीएलमधील संघ जमैका तालावाजसाठी खेळणार होते.
महमूदुल्ला म्हणाला, "मी संघासोबत करार करणार होतो. परंतु माझे कुटुंब चिंतेत आहेत. या क्षणी माझ्या प्रवासाबद्दल त्यांनाही चिंता वाटत आहे. मी यापूर्वी सीपीएलमध्ये खेळलो आहे. मी तेथे नेहमी खेळण्याचा आनंद लुटला आहे.''