ढाका - आयसीसीने बांगलादेश संघाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ वर्षांची बंदी घातली आहे. मॅच फिक्सिंगसाठी बुकीने शाकिबला संपर्क साधला होता. मात्र, याची माहिती शाकिबने आयसीसीला दिली नाही. यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शाकिब जितका आपल्या अष्टपैलू खेळामुळे प्रसिद्ध असून तितकी त्याची पत्नीही प्रसिद्ध आहे.
शाकिब अल हसनच्या पत्नीचे नाव उम्मी अहमद शिशिर असे आहे. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. २०१२ ला शाकिब इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा शाकिब आणि उम्मी यांची भेट पहिल्यांदा एका हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर त्या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. तब्बल दोन वर्षानंतर दोघांनी प्रेमाची कबुली दिली आणि ते १२ डिसेंबर २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले. या दोघांना एक गोंडस मुलगी आहे.