ढाका - बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना आपल्या कसोटी संघाचे फलंदाजी सल्लागार पद स्वीकारण्याची विनंती केली आहे. याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी दिली. ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.
याविषयी चौधरी यांनी सांगितलं की, 'कसोटी क्रिकेटसाठी फलंदाजी सल्लागार या पदासाठी आम्ही संजय बांगर यांना काम करण्याची विनंती केली आहे. मात्र त्यांच्याकडून अजुनही उत्तर आलेले नाही.'
४७ वर्षीय बांगर बीसीबीच्या विनंती स्वीकारु शकत नाहीत. कारण बांगर यांचा स्टार स्पोर्ट्ससोबत दोन वर्षांचा करार आहे. याविषयी बांगर यांनी सांगितलं की, 'बीसीबीने सल्लागार पदाचा प्रस्ताव ठेवला होता. पण मी स्टारसोबत करारबद्ध आहे. पण, भविष्यात मला बांगलादेश संघासोबत काम करण्यास आवडेल.'