बंगळुरू -आयपीएलच्या बाराव्या मोसमातील ५४ व्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरू घरच्या मैदाावर सनरायजर्स हैदराबादचा सामना करणार आहे. आठ संघांच्या गुणतालिकेत सर्वात कमी गुण मिळवणारा विराटचा बंगळुरु संघ प्लेऑफच्या रेसमधून यापूर्वीच बाहेर पडला आहे. तर हैदरबादला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे.
हैदरबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या अनुपस्थितीत मनीष पांडेने संघाची जबाबदारी खांद्यावर घेत मागच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात शानदार फलंदाजी केली होती. त्याच्या अर्धशतकी खेळीने हैदराबादने सामना सुपर ओव्हरमध्ये नेला होता. पांडेने या सामन्यात ४७ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी केली होती.
हा सामना जिंकायचा झाल्यास पांडेव्यतिरक्त कर्णधार केन विलियम्सन, विजय शंकर आणि रिद्धिमान साहाच्या चांगल्या फलंदाजीची गरज हैदराबादला असणार आहे. यांच्यासोबत अफगाणिस्तानची जोडी रशीद खान आणि मोहम्मद नबी यांच्यांवरही हैदराबादला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.
विराटच्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघांचे आयपीएलमधील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या आपल्या अखेरच्या सामन्यात हंगामाचा शेवट गोड करण्याचीच संधी त्यांच्यापुढे असेल. हा सामना आज रात्री ८ वाजता बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु -विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक) हेन्रिच क्लासिन (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज,मोईन अली, कॉलिन डी ग्रॅण्डहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.
सनरायजर्स हैदराबाद -केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.