ढाका (बांग्लादेश ) - वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशने आपल्या संघाची घोषणा केली आहे. अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनची संघात वापसी झाली आहे. दरम्यान, उभय संघात दोन सामन्याची कसोटी खेळवली जाणार आहे.
आयसीसीने एका ट्विटच्या माध्यमातून, बांग्लादेशने १८ सदस्यीय संघ निवडला असल्याचे सांगितले आहे. बांग्लादेश संघाचे नेतृत्व मोमिनुल हक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
बांग्लादेश आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला ३ फेब्रुवारीपासून चटोग्राममध्ये सुरूवात होणार आहे. यानंतरचा दुसरा सामना ११ फेब्रुवारीपासून ढाका येथे खेळला जाईल.