लंडन -इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरने म्हटले आहे, की कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या परिस्थितीत आयपीएल न होणे ही वाईट गोष्ट आहे. आयपीएलची सुरुवात २९ मार्चपासून होणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे ती १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या बटलरला यावर्षी आयपीएल होण्याची आशा आहे. बटलरने एका वृत्तसंस्थेला सांगितले, की आयपीएल केव्हा होईल हे जितके तुम्हाला माहित आहे तितके मला माहित नाही. सध्या सर्व काही अनिश्चित आहे, हा काळ किती टिकेल हे कोणालाही ठाऊक नाही.