कराची -ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाचा फलंदाज सरफराज अहमदला संघातून डच्चू देण्यात आला आणि टी-२० संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपवण्यात आले. या नियुक्तीनंतर, बाबरने आपली एक इच्छा बोलून दाखवली.
'कोहलीसारखं बनायचंय मला', पाकिस्तानच्या कर्णधाराची इच्छा - कोहलीसारखं बनायचंय मला न्यूज
लंकेविरूद्धच्या मालिकेत झालेल्या दारूण पराभवामुळे सरफराजची हकालपट्टी करण्यात आली आहे. पीसीबीने ट्विटरच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी-२० आणि कसोटी संघाची घोषणा केली.
!['कोहलीसारखं बनायचंय मला', पाकिस्तानच्या कर्णधाराची इच्छा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4876203-1042-4876203-1572085071980.jpg)
'कर्णधार असल्यामुळे माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी संघासोबत वैयक्तिक कामगिरीकडेही लक्ष देत आहे. संघासोबत स्व:ताला कसे जपावे हे विराट आणि विल्यमसन यांच्याकडे पाहिल्य़ावर कळतं. त्यांच्यासारखी पात्रता ठेवण्याचा मी प्रयत्न करेन', असे बाबरने म्हटले आहे.
लंकेविरूद्धच्या मालिकेत झालेल्या दारूण पराभवामुळे सरफराजची हकालपट्टी करण्यात आली आहे. पीसीबीने ट्विटरच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी-२० आणि कसोटी संघाची घोषणा केली. सरफराजऐवजी मोहम्मद रिझवानला कसोटी आणि टी-२० संघात यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षक मिसबाह उल हकने सरफराज अहमदचे कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी शिफारस पीसीबीला केली होती. तेव्हाच सरफराजचे कर्णधारपद धोक्यात आले होते.